BREAKING NEWS
latest

दुकानांच्या अतिक्रमण व अनधिकृत शेड्सवर कंडोमपा 'ग' प्रभागक्षेत्राची तोडू कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीच्या नवनियुक्त आयुक्त महोदया डॉ.इंदूरणी जाखड यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारताच दुकानांच्या अनधिकृत बांधलेल्या शेडवर व सार्वजनिक रास्ता व्यापलेल्या अतिक्रमाणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डोंबिवलीच्या 'ग' प्रभाग क्षेत्रा अंतर्गत स्टेशन परिसरातील दुकानांच्या अनधिकृत बांधलेल्या शेडवर जेसीबी च्या साहाय्याने तोडक कारवाई केली आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशान्वये 'ग' प्रभाग क्षेत्रातील कारवाई दरम्यान प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, फेरीवाला विभाग पथकाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे, पथक प्रमुख विलास साळवी, पथक प्रमुख सुनील सुर्वे, अनिल वाल्मिकी, श्याम जाधव, निलेश उबाळे, विलास पाटील, एकनाथ भस्मा, वैशम ठाकूर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते तसेच ठेकेदाराचे पाच कामगार एक जेसीबी, एक क्रेन, दोन डंपर, वाहन चालक गणेश मुरुडकर इत्यादी कर्मचारीवर्ग कारवाईमध्ये उपस्थित होते.
स्टेशन परिसरातील अनधिकृत शेड्सवर व सार्वजनिक रास्ता व्यापलेल्या अतिक्रमणावर झालेल्या कारवाई मध्ये एकूण ४१ दुकानांच्या वेदर शेड्स, तसेच दुकानापुढे केलेले अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. त्यात आठ लोखंडी स्टॉल टपऱ्या, पाच हातगाड्या, दोन चहाचे स्टॉल, एक पिझ्झा स्टॉल, अशी सात अतिक्रमणे निष्काशीत करण्यात आली. प्रचंड विरोध होऊन्ही विरोधाला न जुमानता सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आणि अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या उपस्थितीत फेरीवाले आणि दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. राजकीय वरदहस्त असणारे काही गुंड प्रवृत्तीच्या फेरीवाले आणि दुकानदारांनी राजकीय दडपण आणण्याचा खूप प्रयत्न केला. पथक प्रमुखांना धमक्या देखील दिल्या जात आहेत असे बोलले जात आहे.
फेरीवाल्यांचे अनधिकृत शेड्स पाडण्याची कारवाई थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दडपण सुद्धा येत होते. पण कोणत्याही दडपणाला व दबावाला बळी न पडता सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आणि फेरीवाले पथकाचे  अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी धडक कारवाई केली. फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे ज्या शेड्स बांधल्या आहेत त्यासाठी लागणारा पैसा स्थानिक सावकारांकडून व्याजाने  घेतला आहे आणि यामध्ये काही नगरसेवकांचे संबंध असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजले जाते
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत