BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४/ 'जे', ९/'आय' व १०/'ई' प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.३०: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नवनियुक्त महिला आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार क्र. ४/'जे' प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण (पूर्व) शिवाजी कॉलनी रोडवर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या एकूण ७ वेदर शेड्सवर निष्कासनाची धडक कारवाई काल केली. सदर कारवाई फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली.
क्र. ९/'आय' प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पूर्व) कल्याण-शीळ रोडवरील  एकूण ४ अनधिकृत  गाळ्यांच्या बांधकामावर आणि शहर विद्रुपीकरण करणाऱ्या ५ शेड्स, २ टपऱ्यांवर निष्कासनाची धडक कारवाई केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी च्या सहाय्याने काल  करण्यात आली.
तसेच १०/'ई'  प्रभागाचे सहा.आयुक्त भरत पवार यांनी डोंबिवली पूर्वेतील 'मानपाडा रोड' ते 'स्टार कॉलनी' व 'साईबाबा मंदिर ते मानपाडा रोड' या ३० मी. रुंद रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होत असलेल्या जुन्या चाळीच्या बांधकामावर आणि ३५ टपऱ्या , २७ शेड्स, ८ हातगाड्या अशा एकूण रस्त्याला बाधित होत असलेल्या ७० अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी व महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि १ जे.सी.बी च्या सहाय्याने करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत