BREAKING NEWS
latest

ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण चे विधानसभा अध्यक्ष ऍड. ब्रम्हा माळी यांची नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 डोंबिवली: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त आणि नियोजन मंत्री मा. नामदार अजित दादा पवार यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बऱ्याच दिवसांनी शासकीय समितीवर नियुक्ती मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हा मा. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. प्रत्येक जिल्ह्याच्या आर्थिक बजेट मधून विविध लेखाशिर्ष अंतर्गत निधीचे वितरण होते. पालकमंत्री अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी सदस्य सचिव असलेल्या या नियोजन समितीमध्ये जिल्ह्यातील आमदार खासदार हे सदस्य असतात. त्यासोबतच अशासकीय सदस्य म्हणून ज्या नियुक्त्या केल्या जातात त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी भोपर येथे राहणारे ऍड. ब्रम्हा माळी यांच्या नावाची शिफारस केलेली होती. ग्रामीण भागातली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळावा या हेतूने केलेल्या ह्या शिफारशीला नामदार अजितदादा पवार यांनी मान्यता देऊन विशेष निमंत्रित म्हणून ज्या नियुक्त्या केल्या आहेत त्यामध्ये ब्रम्हा माळी यांना स्थान देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. 

सदर नियुक्तीसाठी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, समन्वयक आनंद परांजपे यांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचेही ग्रामीण भागातून आभार व्यक्त करण्यात येत असताना ब्रम्हा माळी या तरुण कार्यकर्त्याला पक्षाने न्याय दिल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत