BREAKING NEWS
latest

कडोंमपा प्रशासनाचा भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लक्षवेधी आंदोलन..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली दि.३ : कल्याण-डोंविवली महानगरपालिकेच्या प्रस्तावित ४५ मी रिंग रूट बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न देता, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बेकायदेशीररीत्या एकतर्फी टीडीआर च्या स्वरूपात मोबदला घोषित केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ३० ते ४० मीटर रुंद बाह्यवळण रस्ता (रिंग रूट) प्रस्तावित करीत आहे. मौजे ठाकुर्ली, गावदेवी शिवाजीनगर, चोळे, ई. गावांतून सदर बाह्यवळण रस्ता प्रस्तावित आहे. त्यात स्थानिक भूमिपुत्र यांच्या जागा ह्या रिंग रूट प्रकल्पात बाधित होत असल्याने हा मोबदला पैशाच्या स्वरूपात मिळावा हि शेतकऱ्यांची मागणी आहे व त्याकरिता देवीचापाडा, चिंचोड्याचापाडा, कुंभारखानपाडा व नवापाडा येथील भूमिपुत्र एकत्र येऊन जमीन अधिग्रहणास कायदेशीर व सनदशीर मार्गाने विरोध करत आहेत. त्याकरिता दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान देवीचा पाडा, डोंबिवली पश्चिम येथील चकाचक शिवमंदिर येथे या शेतकरी भूमीपुत्रांने कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. 

येथे पार पडलेल्या लक्षवेधी आंदोलनात अनेक भूमीपुत्रांने आपली मते मांडली. यावेळी सर्वपक्षीय युवा प्रमुख संघटक गजानन जयवंत पाटील, दयानंद म्हात्रे, नंदू म्हात्रे, समाजसेवक मधुकर तुकाराम माळी, उदय मुंडे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, समीर सुरेश पाटील, प्रल्हाद मोरे, हरिश्चंद्र (बंडू) पाटील, संदेश पाटील, सदाशिव बाळाराम म्हात्रे, दीपक ठाकूर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सूत्रसंचालन व प्रस्तावना नितीन म्हात्रे यांनी केले.

शेतकरी जमीन मालक यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका हि नगरविकास कायद्यातील तरतुदीनुसार विकास प्राधिकरण सुद्धा आहे. असे असूनही शेतकरी जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणीची ना वैयक्तिक म्हणणे मांडण्याची कोणतीही संधी न देता तसेच आर्थिक मोबदल्याविषयी शेतकरी जमीन जागा  मालक यांच्याकडून कोणताही प्रस्ताव न स्विकारता एकतर्फी मनमानी पद्धतीने जमीन मालकांच्या जमिनी बळजबरीने अनाधिकाराने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर संपूर्णपणे बेकायदेशीर मार्गाने जमीन ताब्यात घेण्याविरोधात जमिनीमलाक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन रिट याचिका केली आहे. सदरची रिट याचिका क्र.३२२३९/२०२३ मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे असे आंदोलनकारी शेतकरी जमीन जागा मालकांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत