BREAKING NEWS
latest

लोकांना खोटे सांगून व बोलण्यात गुंतवूण त्यांचे सोन्याचे दागीणे व रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा घटक-३ कल्याण ने केले गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ०७ : गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण येथील नेमणुकीतील पोलीस हवालदार किशोर पाटील व कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहीती मिळाली की, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६०८/२०२३ भादंवि कलम ४२०, ३४ या गुन्हयातील फसवणुक करणारे दोन संशयीत आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या एसटी बस स्टॅण्ड येथे येवून तेथून एसटी बसने बाहेर गावी पळून जाणार आहेत. सदर मिळालेल्या माहीतीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या आदेशान्वये घटक-३ कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी एस.टी. स्टॅण्ड, कल्याण पश्चिम येथे मापळा रचुन संशयीत इसम नामे १) नरेश विजयकुमार जैसवाल (वय: ४० वर्षे) रा. डी/१, रूम नं. १०१, शांती सुमती बिल्डींग, म्हाडा कॉलनी, भारतनगर, चेंबूर, मुंबई नं. ७४, व २) अनिल कृष्णा शेट्टी (वय: ४५ वर्षे) रा. होमबाबा टेकडीवर भाडयाची खोली, हनुमान नगर, नेतीवली नाका, कल्याण पुर्व यांना सायंकाळी १९:१५ वाजता ताब्यात घेतले, त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात वर नमुद गुन्ह्यातील चोरी गेलेला ऐवज सोन्याचे दागिने तसेच महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, विष्णूनगर व डोंबिवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकुण ६ फसवणुकीच्या गुन्ह्यातील लंपास केलेले सोन्याचे दागिने असा एकुण ३,७३,५००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, घटक - ३. कल्याण यांना यश प्राप्त झाले आहे. सदर दोन्ही आरोपींना फसवणुकीच्या नमूद गुन्ह्यातील पुढील तपासकामी सापडून आलेल्या मुद्देमालासह महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, कल्याण यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

प्रस्तुत कामगिरी मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शिवराज पाटील, पोलीस उप-आयुक्त(गुन्हे व मा. निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, पो.उपनि संजय माळी, पो.हवा. किशोर पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, अनुप कामत, पो.ना. सचिन वानखेडे, पो.कॉ. रविंद्र लांडगे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, चा. पो.हवा. अमोल बोरकर यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत