कल्याण दि.०६ : आजचा दिवस हा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. पूर्वीची खिळ्यांच्या पत्रकारीतेपासून ते आजच्या प्रिंट आणि ऑनलाईन पत्रकारीतेबाबत अनेक उदाहरणे देवून आजच्या डिजिटल पत्रकारितेला किती महत्व प्राप्त झाले आहे याची उत्कृष्ठपणे माहिती लोकमत चे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे यांनी सांगितली. तर निर्भीड पत्रकारिता आजच्या काळाची गरज आहे त्यातूनच आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका लक्षात येत असल्याचे उपस्थीत पत्रकारांना सांगत आमदार गणपत गायकवाड यांनी सर्व उपस्थित पत्रकारांना शुभेच्या दिल्या.
प्रेस क्लब, कल्याण यांच्या वतीने 'पत्रकार दिन' सोहळा कल्याण येथील स्वामीनारायण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वरील मान्यवरांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्या व मार्गदर्शन केले. यावेळी आपण ज्या क्षेत्रात आहोत, आपल काम हीच आपली ओळख आहे. आजचा दिवस आपल्याला प्रेरणा घेऊन काम करण्यासारखा आहे. आपण स्वतःला अंतर्मुख करून पाहिले पाहिजे, माणसांना आजकाल व्यक्त होण्यासाठी सुद्धा भीती वाटते. आपण आपल्यापासून लांब होत चाललो आहोत. चांगल्याला चांगल आणि वाईटाला वाईट म्हणण्यालाही सुद्धा सध्या आपली हिम्मत होत नाही. मग आपण का जगतोय ? हा प्रश्न निर्माण होतो असे मत जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या वेळी आमदार गणपत गायकवाड, केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर, सहसचिव दिनेश शेळके, लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे, जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते विषेश सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष विष्णूकुमार चौधरी यांनी केले व कल्याण डोंबिवली शहर परिसरातील पत्रकारांना मुबलक दरात घरे कसे मिळतील याबाबत पाठपुरावा केला असून त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. जनसंपर्क अधिकारी माधवी फोफळे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले व शुभेछ्या दील्या. ज्येष्ठ समाजसेवक दिनेशभाई ठक्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रेस क्लब चे सचिव अतुल फडके यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा