BREAKING NEWS
latest

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात २५००० महिलांसाठी भव्य-दिव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन!

 

संदिप कसालकर

२५००० महिलांसाठी भव्य दिव्य अश्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धर्मेंद्र नाथ ठाकूर तसेच समाजसेविका ममता ठाकुर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी परिसरात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.


दरम्यान या प्रसंगी हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. सलग १२ वर्षांपासून आपण अश्या प्रकारचे उपक्रम जोगेश्वरी पूर्वेतील वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबवत असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. अश्या उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यास मदत होत असून घराघरात हि पोहोचता येते. आशीर्वादही मिळत असतो असे धर्मेंद्र नाथ ठाकूर यांचे मत आहे.


दरम्यान सदर उपक्रम न फक्त वार्ड क्रमांक ७७ मध्ये राबविण्यात येणार असून संपूर्ण जोगेश्वरी विधानसभेतील ३० वेगवेगळ्या ठिकाणी २५,००० महिलांसाठी सलग १७ दिवस हळदीकुंकू कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे ठाकूर आणि सांगितले आहे.« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत