BREAKING NEWS
latest

शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि.२७ : आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांना आज त्यांच्या ७३ व्या जन्मदिनानिमित्त शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेमध्ये शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी "धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो ! शिवसेना जिंदाबाद ! हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ! महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे यांचा विजय असो ! कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विजय असो !" अशा घोषणा देऊन शिवसेना शाखेचा परिसर दुमदुमून सोडला.
डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचे सोबत कार्यालय प्रमुख प्रकाश माने, सहकार्यालय प्रमुख सागर बापट, डोंबिवली पूर्व महिला शहर संघटक स्वातीताई हिरवे, उपशहर संघटक सुदाम इजाधव, उपशहर संघटक महिला आघाडी सौ. प्रतिक्षा प्रकाश माने, उपविभाग प्रमुख अरविंद वत्रे, उपकार्यालय प्रमुख बालन मोरे, विभाग प्रमुख संदेश पाटील, टिळक नगरचे शाखाप्रमुख मिलिंद केळुसकर, शिवसैनिक ओम वायंगणकर, कार्यालयीन कर्मचारी रोहित जमादार आदी मान्यवर पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात श्रद्धेने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत