BREAKING NEWS
latest

रोहित पवारांची 'ईडी' कडून कसून चौकशी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले त्यांची सुमारे नऊ तासाहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. रोहित पवार यांनी 'ईडी' कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत शरद पवार यांचा आशीर्वाद घेतला. खासदार सुप्रियाताई सुळे देखील यावेळी त्यांच्या सोबत होत्या.

रोहित पवार यांच्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुनील भुसारा उपस्थित होते. 'ईडी' कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून मोठी घोषणाबाजी करण्यात आली. रोहित पवार यांची चौकशी सुरू असताना राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी 'ईडी' ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती, 'ईडी' विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. बारामती ऍग्रो कंपनीच्या कथित घोटाळा प्रकरणी पवार यांची ही चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी बारामती ऍग्रो कंपनीच्या कार्यालयांवर यापूर्वी 'ईडी' ने छापेमारी करत तपास केला होता.

सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार आहे. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांना 'ईडी' कार्यालयात सोडल्यानंतर प्रसार माध्यमांची बोलताना प्रतिक्रिया दिली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत