डोंबिवली दि.०५: गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण, पोलीसांकडुन विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०५/२०२४ भा.दं.वि.स. कलम ४५४, ३८० या गुन्हयाचा समांतर तपास करण्यात येत होता. सदर गुन्हयाच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोहवा. विश्वास माने, पोकाँ. गुरूनाथ जरग यांनी प्राप्त केले. तांत्रिक विश्लेषनात गुन्हयाच्या घटनास्थळ परिसरातील फिर्यादीच्या सोसायटी बाहेर असणाऱ्या कंपाऊंड वरून एक महिला संशयीत रित्या येत जात असताना दिसुन आली.
सदर वर्णनाच्या संशयीत महिलेचा डोंबिवली परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. तसेच सदर संशयीत महिलेचे वर्णन हे गुन्ह्यातील फिर्यादी आस्था पाटील, रा. खेती रोड, डोंबिवली (पश्चिम) यांना दाखवुन खात्री करताच नमुद संशयीत महिला ही त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण श्रीमती गंगुबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी रा. मोठागाव, डोंबिवली (पश्चिम) हिच्या वर्णनाशी मिळते जुळते असल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर संशयीत महिला मोलकरणीस ताब्यात घेवुन तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने प्रथमतः उडवाउडवीचे उत्तरे देवुन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक विश्लेषणासह तिच्याकडे सखोल चौकशी केली असता ती जास्त वेळ खोटे बोलुन दिशाभुल करू शकली नाही व तिने सरतेशेवटी फिर्यादी यांच्या घरी कामास असताना त्यांच्या घरातुन सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुल करून सदर नमुद गुन्ह्यातील सर्व १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढुन दिले आहेत. तपासात तिच्याकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकुण २,९७,०००/- रूपये कींमतीचे दागिणे हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणच्या पोलीस पथकास यश प्राप्त झाले असुन पुढील तपास गुन्हे शाखेकडुन करण्यात येत आहे.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंजाबराव उगले, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, मा. सहा पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि. राहुल मस्के, सपोनि. संदिप चव्हाण, पोउपनि. संजय माळी, पोहवा. विश्वास माने, बालाजी शिंदे, दत्ताराम भोसले, किशोर पाटील, विलास कडु, मपोहवा. मेघा जाने, मिनाक्षी खेडेकर, मपोशि. मंगल गावित, पोना. महाजन, पोशि. गुरूनाथ जरग, नवसारे, शेकडे, लांडगे, चापोहवा. अमोल बोरकर यांनी यशस्वीपणे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा