BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' संस्थेच्या खजिनदार व दिग्दर्शिका कु.जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांसह धूमधडाक्यात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
       
डोंबिवली दि.१७ : वाढदिवस म्हणजे अप्रूप आणि आनंद वाटणारी गोष्ट आहे. 'जे एम एफ' संस्थेच्या खजिनदार जान्हवी मॅडम यांचा वाढदिवस नेहमीच सर्वांना आपुलकीचा जिव्हाळा निर्माण करणारा असतो. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे साक्षात ईश्वराचाच वरदहस्त मस्तकावर ठेवून घेण्यासारखा आहे असा साक्षात्कार होणे होय. असे हे भाग्य आज जान्हवी कोल्हे यांना त्यांच्या वाढदिवशीदिनी लाभले. जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस हा 'आजी आजोबा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आजी आजोबांना देखील आपल्या पाल्यांसोबत आनंद घेता येतो.
संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे व सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी गेली अनेक वर्षापासून हा उपक्रम निरंतर चालू ठेवला आहे. आपल्या कन्येला सर्वांचे भरभरून आशीर्वाद मिळावे व तिच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात हीच मनोकामना असते. दरवर्षी वाढदिवसाला आजी आजोबांना सस्नेह निमंत्रण देऊन त्यांच्यासह जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यादिवशी आजी आजोबांना घेऊन छोटीशी सहल आयोजित केली जाते. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मंदिरे यांना भेट देऊन तिथे जाऊन सगळ्यांना नास्ता देऊन त्यांच्या बरोबर वाढदिवस साजरा केला जातो.
ह्या वर्षी सर्व आजी आजोबांना व पाल्यांना वाढदिवसाचे आगत्याचे आमंत्रण दिले गेले व शाळेच्या 'मधुबन' वातानुकुलीत दालनात सुसज्ज तयारीने फळांचा केक बनवून कापला गेला व सर्व मुलांनी वाढदिवसाचे संस्कृत गाणे गाऊन गाण्यातूनच जान्हवी कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या. सर्व आजी आजोबांनी भरभरून आशीर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव केला. जान्हवी कोल्हे ह्यांच्या मातोश्री व सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी व त्याचबरोबर आजींनी देखील जान्हवीचे औक्षण केले. सर्वांना फलाहार देण्यात आला. त्याच बरोबर सर्व आजी आजोबांना भेटवस्तू म्हणून बॅग देण्यात आल्या तर मुलांना शालेय साहित्य देण्यात आले.
ज्याप्रमाणे पक्षी आकाशात उत्तुंग भरारी घेत असताना त्यांचे आई बाबा कौतुकाने त्यांच्या कडे बघत असतात, त्याच प्रमाणे उत्तुंग यशाची भरारी घेताना आमचेही डोळे अभिमानाने, कौतुकाने आणि आतुरतेने भरून येतात, आयुष्यमान भव, यशस्वी भव, किर्तीवान भव, असा आशीर्वाद माता-पिता डॉ. राजकुमार कोल्हे आणि डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या लाडक्या सुपुत्री जान्हवीला दिला. जगात हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे आजी आजोबा, भावनिक आधार, हक्काने आणि अधिकाराने मागण्याची व हट्ट पुरवण्याची जागा म्हणजे आजी आजोबा. आज तुमच्या मोलाच्या आशीर्वादाने पुन्हा मला नवचैतन्य मिळाले अशी भावना व्यक्त करून जान्हवी कोल्हे यांनी आजी आजोबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
साधारण १०० आजी आजोबा व त्यांची नातवंडं यांना घेऊन पिंपळेश्वर महादेव मंदिर व दत्त मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले. बस मधे गाण्याचा भेंड्या, गोष्टी, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव सांगत सर्व आजी आजोबांनी सहलीच्या प्रवासाचा आनंद घेतला. दोन्हीकडे मंदिरात आरती व स्तोत्र पठण करून सर्वच पालक वर्ग प्रसन्न झाला. डॉ. श्री. रमेश व सौ. चारुशीला गुजराथी यांनी दत्त मंदिरात क्षणभर विश्रांतीची सोय करून दिल्यामुळे सर्वांना अल्पोपहार चा आस्वाद आनंदात घेता आला."एक दिवस आजी आजोबांचा" असा स्तुत्य उपक्रम 'जे एम एफ' शिक्षण संस्थेत १७ फेब्रुवारी रोजी राबविला जातो. साधारणत: दिवसभराच्या प्रवासामध्ये  यत्किंचितही शीण न जाणवता सर्व आजी आजोबा आनंदाने आणि उत्साहाने घरी परतले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत