मुंबई : राज्यातील खासगी शाळांमध्ये २००९ साला पासून सुरु असलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया खासगी शाळांमध्ये बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गरीब घरातील मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत मिळणारे शिक्षण आता कायमचे बंद झाले आहे. त्याचप्रमाणे खासगी इंग्रजी शाळेच्या १ किमी अंतरावर जर अनुदानित शाळा असेल तर विद्यार्थ्यांना त्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे पण खासगी इंग्रजी शाळेत यापुढे आरटीई प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीत हे निर्णय पाहिले तर खासगी शाळांमध्ये आता मोफतचे शिक्षण बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाचे सचिव तुषार महाजन म्हणाले की, आम्हाला सरकारी आणि अनुदानित शाळांना बळ देण्यासाठी हे निर्णय घ्यावे लागत आहे. आरटीई प्रवेशासाठी लागणारा खर्च आम्ही आमच्या सरकारी शाळांमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी वापरणार असून या निर्णयामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार असल्याचे महाजन एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाकडून जवळपास २ हजार कोटी खासगी इंग्रजी शाळांना देण्यात येते. त्याचप्रमाणे सरकारी शाळांवरदेखील मोठ्याप्रमाणात शिक्षण विभागाकडून मोठा निधी खर्च करण्यात येतो त्यामुळे एक खर्च वाचविण्यासाठी संबधित निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी कळले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा