BREAKING NEWS
latest

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवजयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि.१९ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन केल्यानंतर, महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी महापालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तद्नंतर कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त दालनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस व अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यासमयी महापालिका सचिव तथा उपायुक्त वंदना गुळवे, उपायुक्त धैर्यशील जाधव, प्रसाद बोरकर, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, प्रशांत भागवत, सहा.आयुक्त स्नेहा करपे, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे महापालिका शाळांमधील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
डोंबिवली विभागीय कार्यालयातही महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन केल्यानंतर, महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप, राजेश सावंत व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिका शाळा क्रं.६८ तसेच शाळा क्रं. ९०/३ (उर्दू शाळा) या शाळांमधील विद्यार्थी वर्गांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडद्वारे तसेच लेझीमद्वारे स्वस्तिकाचे प्रात्यक्षिक लिलया घडवीत, उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत