BREAKING NEWS
latest

कल्याणमधील 'सीटी पार्क' फेब्रुवारीपर्यंत निशुल्क तर १ मार्चपासून शुल्क आकारण्यास महापालिकेकडून सुरुवात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण मधील गौरीपाडा येथील भव्य 'सीटी पार्क' २९ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना निशुल्क ठेवण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घेतला आहे. १ मार्चपासून पालिकेने निर्धारित केलेले प्रवेश शुल्क आकारून नागरिकांना 'सीटी पार्क'मध्ये प्रवेश दिला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'सीटी पार्क'चे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभर 'सीटी पार्क' मध्ये नागरिकांना प्रवेश निशुल्क ठेवण्यात आला होता. ही मुदत आता फेब्रुवारी अखेरपर्यंत वाढविण्यात आली असून गौरीपाडा येथील 'सीटी पार्क' हे   मनोरंजन आणि विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण म्हणून कल्याण परिसरातील नागरिक अधिक संख्येने पार्कला भेट देत आहेत.

नागरिकांचा 'सीटी पार्क' ला भेट देण्याचा वाढता प्रतिसाद पाहून आयुक्तांनी ही मुदतवाढ दिली आहे. येत्या १ मार्चपासून प्रशासन निश्चित करील त्या प्रवेश शुल्काप्रमाणे 'सीटी पार्क'मध्ये येणाऱ्या नागरिकांकडून योग्य ते शुल्क आकारले जाईल, असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. कल्याण, डोंबिवली परिसरात प्रथमच मनोरंजनाचे नवीन ठिकाण 'सीटी पार्क'च्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत