BREAKING NEWS
latest

कल्याण मध्ये स्फोटके सापडल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात वाढला पोलीसांचा बंदोबस्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्टेशन मध्ये १ नंबर प्लॅटफॉर्मवर एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. यांनतर आता डोंबिवली लोहमार्ग पोलीसांनी डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, अप्पर कोपर, जुचंद्र या रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. रेल्वे स्थानकात संशयित व्यक्तींची बॅगची तपासणी सुरु झाली असून हँड डिटेक्टर मार्फतहि तपासणी सुरु झाली आहे. रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा घेतली जात असून प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे पोलीसांकडून करण्यात आले आहे.

ठाणे रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या 'आय अँड इयर' संकल्पनेनुसार डोंबिवली रेल्वे स्थानक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या देखरेखीखाली पोलीस अधिकारी व पथक प्रवाश्यांच्या बॅगेची तपासणी करत आहेत. या संकल्पनेनुसार रेल्वे स्थानकातील सफाई कामगार, बूट पॉलीशवाले, पेपरवाले, कँटीनवाले हे रेल्वे स्थानकातील प्रवाश्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. ३६५ दिवस २४ तास पोलीसांचा हा तिसरा डोळा असून रेल्वे स्थानकात काही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलीसांना याची माहिती पुरवितात. यामुळे पोलीस यंत्रणा सदर जागी तपासणी करतात. यात डॉग स्क्वॉड ची मदत घेतली जात आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलीस आयुक्तांनी 'आय अँड इयर' संकल्पनेनुसार डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, अपर कोपर, जुचंद्र या रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत