BREAKING NEWS
latest

उघड्या दरवाजावाटे घरात घुसून चोरी करणारा चोरटा गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: उघड्या दरवाजावाटे घरात घुसून चोरी करणाऱ्या आरोपीला रामनगर पोलीसांनी ३ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. समीर जगत सोनार (वय: २० वर्षे) रा. समतानगर झोपडपट्टी, आयरेगांव डोंबिवली पूर्व असे अटक आरोपीचे नाव आहे.

समीरने तो राहत असलेल्या भागात शेजारी राहणाऱ्या अशोककुमार चव्हाण या भाजीपाला विक्रेत्याच्या घराच्या उघडया दरवाजावाटे घरात घुसून रोकड आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. दरम्यान रामनगर पोलीसांनी गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या तीन तासाच्या आत संबंधित गुन्हा उघडकीस आणत आरोपी समीरला बेडया ठोकल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितिन गिते यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. 
ही कारवाई डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार सुनील भणगे, विशाल वाघ, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड आदींनी यशस्वीपणे केली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत