BREAKING NEWS
latest

मोबाईलचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोन इसमांना गुन्हे शाखा घटक-३ कल्याण पोलीसांनी केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दि २० रोजी गुन्हे शाखा घटक-३ चे पोहवा. दत्ताराम भोसले यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दोन इसम विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील परिसरात चोरीचे मोबाईल विक्रीसाठी घेवुन येणार आहेत. सदर बातमीनुसार इकडील घटकातील पोलीस अधिकारी वा अमंलदार यांनी पुना लिंक रोड, विठ्ठलवाडी बस डेपोसमोर सार्वजनिक रोडवर सापळा लावुन चोरीचे मोबाईल विक्री करीता घेवुन आलेले दोन संशयीत इसम नामे विरेंद्र जयवंत नाटेकर (वय: ३९ वर्षे) व्यवसाय: सेफ्टी ऑफिसर रा. रूम नं. २०२, धरमसाई पॅलेस सोसायटी, पिंटु पार्क हॉटेलजवळ उल्हासनगर-०३ व प्रेम श्यामजी दुवा (वय: २९ वर्षे) रा. बॅरेक नं. १३१७ रूम नं. ०८ उल्हासनगर स्टेशन रोड, स्वागत मेडीकल जवळ, उल्हासनगर-०४ यांना दुपारी ०१:०५ वाजता मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या मोबाईल बाबत दोघांकडे सखोल विचारपुस करता त्यांनी सांगितले की, त्या दोघांच्या ओळखीचा मित्र फिरोज खान उर्फ मोनु रा. नगरसेवक अरविंद वाळेकर यांच्या घराच्या पाठीमागे अंबरनाथ पश्चिम याने डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्यालगत असणारे 'गणेश इलेक्ट्रॉनिक'  मोबाईलचे दुकान मागून भिंतीवरून चढून वरील पत्रा उचकटून आत शिरून छताची पीओपी फोडुन चोरी केले आहेत व ते मोबाईल विक्री करण्याकरीता विठलवाडी स्टेशनसमोर, कोळशेवाडी परिसरात ते घेवुन आल्याचे सांगत असल्याने त्यांना गुन्हे शाखा घटक-३ कल्याण च्या  पोलीस पथकाने पकडले आहे. सदर मोबाईल चोरी बाबत खात्री करता, डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. १२८/२०२४ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्याकडुन एकुण ६२,०००/- रू. किंमतीचे ०६ स्मार्टफोन मोबाईल व ०१ टॅब असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर दोन आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सापडलेल्या मुद्देमालासह डोंबिवली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे व फिरोज खान हा फरार असून कल्याण गुन्हे शाखा त्याचा शोध घेत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मा. शिवराज पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व मा. निलेश सोनावणे सहा. पोलीस आयुक्त, (शोध १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि. राहुल मस्के, सपोनि. संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोउनि. संजय माळी, पोहवा. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कडु, पोना. दिपक महाजन, पो.कॉ. गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, अनुप कामत, विश्वास माने, गोरक्ष शेकडे यांनी उत्तमरित्या केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत