BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत मराठी राजभाषा दिवसाचे दिमाखदार साजरीकरण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 डोंबिवली दि.२७ : आपली शान मराठी, आपला अभिमान मराठी, माझी मराठीचीये बोली, माझा मराठीचीये बाणा, अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचा सर्वच महाराष्ट्रीयन माणसाला सार्थ गर्व आणि अभिमान आहे. ज्येष्ठ कवी, साहित्यिक वि.वा. शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांचा २७ फेब्रुवारी म्हणजे जन्म दिवस. अवघ्या महाराष्ट्रामधे हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 'जे एम एफ' प्रांगणात देखील मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने 'जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर ने 'मराठी राजभाषा दिवस' जल्लोषात साजरा केला.
'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे त्याच बरोबर मुख्याध्यापिका श्यामला राव, उप-मुख्याध्यापिका ज्योती वेंकट तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम लेखकांच्या 'पुस्तकांची ग्रंथ दिंडी' काढण्यात आली. पालखी मधे ग्रंथ ठेऊन ढोल, ताशे, लेझिम वाजवत 'जे एम एफ' च्या प्रवेश द्वारातून दिंडीला सुरुवात झाली व मधुबन वातानुकुलीत दालनात दिंडीचे आगमन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी दिंडीला ओवाळून फुले वाहिली. मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले व कविवर्य 'कुसुमाग्रज' यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला. त्यानंतर इयत्ता चौथी मधल्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले. काही मुले मुली तर साहित्यिकांच्या वेशभूषेमधे तयार होऊन आले होते जसे व.पू. काळे, कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर, बहिणाबाई चौधरी अशा अनेक रुपात संस्थेचे विद्यार्थी सजून आले होते. 
साहित्यिक बनून आलेल्या छोट्या बाल कलाकारांनी शाल व  पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांचा सत्कार केला. त्याच बरोबरच मराठी शिक्षिका सौ. सुप्रिया कांबळे, सौ. मानसी शिंगटे, सौ. प्रियांका म्हस्के यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मराठी भाषा ही वळवाल तशी वळते आणि हीच भाषा प्रत्येक वेस बदलता ५२ पद्धतीने, वेगवेगळ्या लयी मधे बोलली जाते असे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून. बाराखडी मधील 'अ ते ज्ञ ' म्हणजेच अज्ञाना कडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजेच शिक्षण आणि आपली मराठी भाषा आहे असे समर्पक उदाहरण उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. माणुसकी जपा व मराठी अस्मिता जागृत असू द्या, साहित्याचे वाचन करा आणि ते आत्मसात करा असे विद्यार्थ्यांना सांगून मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कविवर्य, लेखक ग.दि. माडगूळकर यांनी 'काय वाढले पानंवरती, काय वाढले पानावरती' अशी दुअर्थी कविता लिहिली होती. अशाच स्वरचित कविता सादर करण्यात आल्या.
मराठी भाषेवर प्रभुत्व, आणि मराठी विषयात पारंगत असलेल्या 'जे एम एफ' संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी देखील स्वरचित कविता व स्वलिखित कथा वाचन करून उपस्थितांची मने जिंकली. 'वाचाल तर वाचाल' ह्या उक्ती प्रमाणे वाचनाचा ध्यास असावा असे सांगून मुलांचे मनोधैर्य वाढवले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्यामला राव तसेच मराठी शिक्षिका सौ. सुप्रिया कांबळे व सौ. मानसी शिंगटे यांनी सुद्धा स्वरचित कवितांचे वाचन केले व कथा सांगितली. इयत्ता पाचवी च्या मुलामुलींनी 'लाभले आम्हांस भाग्य आम्ही बोलतो मराठी'.. हे मराठी अभिमान गीत गाऊन मराठी गौरव दिनाचे अभिवादन केले तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपणारे मराठी नृत्य, नाटक सादर केले गेले. इयत्ता दुसरी मधील छोटे बालक कु. रुही मोरे, मनस्वी भारंबे, आयांश देगावे यांनी 'अस्सलिखित मराठी भाषेचे महत्व' हा विषय घेऊन भाषण केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. घानिका व कु. देवयानी नाईक ह्या विद्यार्थींनी केले. तर आभार प्रदर्शन कु. गार्गी भोसले हीने केले. कार्यक्रमाची सांगता 'जे एम एफ' संस्थेच्या संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज रचीत पसायदानाने करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत