डोंबिवली दि.२९ : 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला.' हे काव्य वाचून अंगावर शहारे येतात व हिंदुत्वाचे रक्त सळसळते असे हे काव्य लिहणारे थोर स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. इतिहासाच्या गर्भात शिरून पुन्हा तोच इतिहास उज्वल करावा असे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दा.सावरकर.
इतिहास विषयाचा अभ्यास करताना मुलांना इतिहासाची सुवर्ण पाने उलटून आपला खरा इतिहास काय आहे दे सदृश्य रित्या कळले पाहिजे व ते आवश्यक आहे असा विचार करून 'जे एम एफ' संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी डोंबिवली पश्चिमेकडील 'गोपी सिनेमागृह' मधे दिनांक आज २९ मार्च रोजी सकाळच्या सत्रामधे 'स्वातंत्रवीर सावरकर' हा चित्रपट सर्व मुलांना दाखवण्याचे आयोजित केले. संपूर्ण 'गोपी सिनेमागृह' राखीव करून पालकांना देखील मुलांबरोबर हा चित्रपट पाहण्याची मुभा दिली. जवळपास पाचशेच्या वर मुले, पालक, संपूर्ण 'जन गण मन' चे शिक्षक वर्ग (सीबीएसई, विद्यामंदिर, ज्युनिअर कॉलेज, डिग्री कॉलेज) तसेच रिक्शा चालक व सुरक्षा रक्षक यांचाही यात समावेश होता.
अनादी मी, अनंत मी, अवध्य मी भला.. मारील रिपु जगती असा कवण जन्मला.. असा कवन जन्मला.. ज्यांनी देशासाठी घरदार सोडले, काळया पाण्याची शिक्षा भोगली आणि अखंड भारताचे बघितलेले स्वप्न पूर्ण केले असे स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर, यांच्यासारखे तुम्ही सुद्धा स्वतःसाठी, देशासाठी निष्ठावान राहा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगून मुलांमधे ऊर्जा निर्माण केली.
हा चित्रपट पाहून मुलांवर नक्कीच उर्जात्मक प्रभाव पडणार असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी कथन करून 'सावरकरांसारखे निस्सीम देशभक्त व्हा', असे सांगितले. सर्वच मुलांनी, त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी जवळपास साडेतीन तास बसून सिनेमा बघण्याचा आनंद घेतला.
काही चित्रपट करमणुकीसाठी असतात, तर काही चित्रपट हे मुलांना प्रेरित करण्यासाठी असतात, ह्या पूर्वी सुद्धा 'सुपर ३०' हा चित्रपट मुलांना सिनेगृहात जाऊन दाखवला गेला होता. मुलांनी देखील प्रयत्न करून आपले भवितव्य घडवावे व देशासाठी काहीतरी करून दाखवावे हाच ह्या मागचा हेतू आहे असे 'जे एम एफ' संस्थेचे संचालक तथा सर्वेसर्वा डॉ.राजकुमार कोल्हे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा