BREAKING NEWS
latest

विदेशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांकडुन अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२९ : मानपाडा पोलीस ठाण्यांचे हददीत टाटा नाका परिसर येथे दिनांक २६/०३/२०२४ रोजी एक इसम बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टिम तयार करुन गुन्ह्यातील आरोपीस पकडण्याकरीता सापळा लावण्यात आला. गुप्त बातमीदार तसेच आरोपीच्या वर्णना नुसार आरोपीचा शोध घेवून आरोपी राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया (वय: ४३ वर्षे) रा. अमर म्हात्रे चाळ, रूम नं ०१, देसलेपाडा, डोंबिवली पुर्व यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेवून त्याच्याकडुन एक विदेशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा एकुण २,००,४००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी याच्या विरूध्द मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस स्टेशन येथे यापुर्वी ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, दत्तात्रय शिंदे साो, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ कल्याण चे सचिन गुंजाळ साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कुराडे साो, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. राजेंद्र खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, दिपक गडगे, पोना. गणेश भोईर, प्रविण किनरे, यल्लापा पाटील, देवा पवार, अनिल घुगे, शांताराम कसबे, रवि हासे, पोशि.अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंझा, नाना चव्हाण, गणेश बडे यांचे पथकाने यशस्वीपणे केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत