BREAKING NEWS
latest

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला साताऱ्यात कंटेनरच्या धडकेने अपघात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

सातारा : देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या ताफ्याला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एका कंटेनरच्या धडकेत कारला अपघात झाला. या अपघातात आठवले कुटुंबीय सुखरुप असून एक महिला किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली.

साताऱ्यात एका कार्यक्रमासाठी गेले असता कार्यक्रम संपल्यावर वाईच्या दिशेने जात असतानाच समोरच्या कंटेनरला पोलीस ताफ्यातील एका गाडीने धडक दिली. त्या‌ कारवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची कार धडकली. कारमध्ये मंत्री रामदास आठवले यांचे कुटुंबीय होते. सर्व कुटुंब सुखरूप आहे मात्र कारमधील एक महिला जखमी असल्याची माहिती पुढे आली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत