BREAKING NEWS
latest

भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल, महाराष्ट्रात सर्व जुने रेकॉर्ड मोडणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

चंद्रपूर दि.२७ : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्रातील आमचे सर्व जुने रेकॉर्ड आम्ही तोडणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करुन, आणि चंद्रपूरची आई महाकालीचे दर्शन घेऊन आम्ही आज सुधीर मुनगंटीवार यांचा फॉर्म भरला आहे. आज नवी सुरुवात झाली असून शेवटही चांगलाच होईल. महाराष्ट्रात आम्ही आमचचे सर्व जुने रेकॉर्ड मोडू. फडणवीस पुढे म्हणाले, ही राज्याची निवडणूक नाही, तर ही देशाची निवडणूक आहे. देश कोणाला सोपवायचा आहे, देशात राज्य कोणाचे आणायचे, मोदींचे की राहुल गांधींचे याचा निर्णय करणारी ही
निवडणूक आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले मत मोदींना दिलेले मत ठरेल.

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत