BREAKING NEWS
latest

विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व ०१ जिवंत काड़तूस बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखेस यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि. २७ : आज  गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोहवा. दत्ताराम भोसले व पोशि. गुरूनाथ जरग यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत डोंबिवली पुर्वच्या बीएसयुपी बिल्डींग, पाथर्ली रोडलगत, शेलार नाका, डोंबिवली (पूर्व) येथे एक इसम देशी वनावटीचा कट्टा विकी करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीची वपोनि. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने बीएसयुपी बिल्डींग, पाथर्ली रोडलगत, शेलार नाका, डोंबिवली पूर्व येथे जावून सापळा लावून १५:५० वाजता राजु हरीराम तिवारी (वय: ५३ वर्षे) रा. रूम नं. ३०५, सिधुदुर्ग अपार्टमेंट, मराठी शाळेजवळ, तळवली, नवी मुंबई यांस २०,०००/- रूपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व २००/- रूपये किंमतीची एक जिवंत काड़तूस असा एकूण २०,२००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात बाळगुन असताना सापडल्याने त्यास अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.

त्यानंतर सदर आरोपी राजु हरीराम तिवारी वय ५३  याच्या कब्जात विनापरवाना बेकायदेशिर रित्या एक देशी बनावटीचा कटट्टा (अग्निशस्त्र) व १ जिवंत काड़तूस (राउंड) सापडल्याने त्याने माननीय पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर यांच्याकडील मनाई आदेशाचा भंग केल्याने त्याचे विरूध्द पो हवा. दत्ताराम निलकंठ भोसले नेम गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी टिळकनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास गुन्हे शाखा, घटक-३. कल्याण कडून करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), व निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोनि. राहुल मस्के, सपोनि. संदिप चव्हाण, पोहवा. दत्ताराम भोसले, विश्वास माने, किशोर पाटील, पोना. दिपक महाजन, पोशि. गुरूनाथ जरग सर्व नेमणूक गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत