डोंबिवली दि.१२ : लोकसभा निवडणुक सन २०२४ च्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध्य धंदे, हातभट्टी दारु, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्याराची विक्री होणार नाही याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे आदेश प्राप्त झालेले असताना त्या अनुषंगाने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध्य प्रकार चालणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेऊन अशा प्रकारचे लपुन छपुन अवैध्य धंदे करणाऱ्यांचा शोध चालु असतानाच मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण प्रथकाचे अधिकारी सपोनि. प्रशांत आंधळे व त्यांच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विको नाका, कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पूर्व) येथे काही इसम हे 'भारत गॅस कंपनी'च्या घरगुती गॅस सिलेंडर मधून प्रत्येकी ०२ किलो गॅस काढून तो कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये भरून कमी वजनाचे गॅस सिलेंडर हे ग्राहकांना वितरित करून फसवणूक करतात, अशी माहिती मिळाली असता सपोनि. प्रशांत आंधळे व त्यांचे पथक यांनी विको नाका येथे सापळा रचून मारुती सुझुकी कॅरी सीएनजी टेम्पो क्रमांक एमएच०५/इएल-५२८९ मधून भारत गॅस कंपनीचे सिलेंडर वितरित करण्याकरिता घेऊन जात असताना घरगुती ३५ व कमर्शिअल ०९ असे एकूण ४४ गॅस सिलेंडर मिळून आले तसेच अवैधपणे गॅस सिलेंडर, टेम्पो, कॉम्प्रेसर पिस्टन, इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण ४,६७,५८५/- रुपये कींमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मानपाडा पोलीस ठाणे गु.र.नंबर ५४०/२४ भादंवि कलम २८५,३३६,३४ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३,७,८ अन्वये प्रमाणे दि. ०४/०४/२०२४ रोजी नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी १) सुजय कदम (वय: ३० वर्षे) राहणार चिकणघर कल्याण पश्चिम, २) पप्पु मिश्रा (वय: ३२ वर्षे) राहणार टाटा नाका पिसवली गाव कल्याण पूर्व, ३) उत्तम बनकर (वय: ५५ वर्षे) राहणार आनंदनगर, मिलींदनगर, कल्याण पूर्व, यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण आणि सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे विजय कादबाने, वपोनि. मानपाडा पोलीस ठाणे, यांच्या देखरेखीखाली राम चोपडे, पोनि (गुन्हे), दत्तात्रय गुंड पोनि. (प्रशा), पोनि. राहुल म्हस्के, सपोनि. प्रशांत आंधळे, संपत फड़ोळ, राळेभात, पोना. अनिल घुगे, गणेश भोईर, प्रविण किनरे, पोहवा. राजेंद्र खिल्लारे, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, सोमनाथ टिकेकर, गडगे, पो.ना. हासे, कसबे, पवार, पोशि. मंजा, नाना चव्हाण, आव्हाड, बडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली आहे.
पोलीसांकडून नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, आपल्या घरी पोहोचणारे गॅस सिलेंडर हे नागरिकांनी शासन नियमानुसार निर्देशित करण्यात आलेल्या वजनाप्रमाणे आपणांस गॅस सिलेंडर वितरीत अथवा डिलेव्हरी कारणाऱ्यांकढुन विहित वजनात पोहचत आहे किंवा नाही याबाबत नियमित खात्री करून घ्यावी जेणेकरुन आपली कोणत्याही प्रकारची अशी फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे पोलीसांतर्फे नागरिकांना सूचित करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा