BREAKING NEWS
latest

वाईनशॉप मधील दारू व वाईन चोरी करून विक्री करणाऱ्या नोकरासह साथीदारास गुन्हे शाखा घटक-०३ कल्याण पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण चे पोलीस कोळसेवाडी पो.स्टे. गु.रजि.नं. ४९५/२०२४ भा.दं.वि. कलम ३८१ या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना दिनांक १३/०४/२०२४ रोजी गुन्हे घटकातील पोशि. गोरक्ष शेकडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी १) सुनिल प्रकाश कुंदल, राहणार: बॅरेक नं. १९३४, रूम नं. १३, ओ.टी.सेक्शन, उल्हासनगर-५ जि. ठाणे, यास गुन्हे घटकातील पथकाने सापळा रचुन उल्हासनगर येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडे केलेल्या सखोल तपासात गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल (वेगवेगळया कंपनीच्या व किंमतीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या) आपसात संगनमत करून ढाब्यावर व दुकानात विक्री करण्यात सहभागी असलेले आणखी ०३ आरोपी २) सुरेश प्रितम पाचारने (वय: २४ वर्षे) राहणार: विठ्ठलनगर झोपडपट्टी, गणपती मदिंराच्या मागे, उल्हासनगर-०५, ३) नरेश राघो भोईर (वय: ३९ वर्षे ) राहणार: जिजाऊ बंगल्याचे बाजुला नरेश किराणा दुकानाच्या वरती, नेवाळी गाव, ता. अंबरनाथ जि. ठाणे, ४) सागर श्रावण पाटील (वय: २४ वर्षे) धंदा: जय भोलेनाथ ढाबा, राहणार: मांगरूळ गाव, ता: अंबरनाथ जि: ठाणे यांना पकडून ताब्यात घेण्यात आले.
सदर पकडण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मालातील दारूच्या सिलबंद बाटल्या व रोख रक्कम असा एकुण २१,६५५/- रूपये किंमतीचा मुद्दे‌माल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेले ०४ आरोपी व हस्तगत करण्यात आलेला मुददेमाल पुढील तपासकामी कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा घटक-३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा. दत्ताराम भोसले, गोरक्ष शेकडे, दिपक महाजन, बालाजी शिंदे, विलास कडू, गुरुनाथ जरग, चालक अमोल बोरकर, या अंमलदारांनी यशस्वीरित्या केलेली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत