BREAKING NEWS
latest

कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मोदी सरकारच्या स्थापने नंतरच मंजुरी मिळाली - देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत
         
मुरबाड : भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ माऊली गार्डन येथे प्रमुख कार्यकर्ता मेळावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, लोकसभा उमेदवार कपिल पाटील, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रमोद हिंदुराव, शिवसेना उपनेता प्रकाश पाटील, सुभाष दादा पवार, उल्हास बांगर, सुभाष अप्पा घरत, वैशाली घरत, मेहबूब पैठणकर, राजेश पाटील, अरविंद मोरे सह विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभेस सुभाष दादा पवार, प्रमोद हिंदुराव, आमदार किसन कथोरे तसेच लोकसभा उमेदवार कपिल पाटील यांनी मार्गदर्शन करत सर्वात जास्त मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश एमएमआरडीएमध्ये करावा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. देवेंद्र फडणवीस नुसते आले नाही तर मतांचा पाऊस घेऊन आले आहेत असेही ते म्हणाले. 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेस संबोधताना देशात मोदी सरकारच्या स्थापने नंतरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग आता कोणीही थांबवू शकत नाही. पुढील टप्प्यात नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. महायुती चे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी आमदार किसन कथोरेंसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाचे रान करतील, हा देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे. व्यासपीठावर कपिल पाटील व किसन कथोरे माझ्या डाव्या-उजव्या बाजूला आहेत. मात्र मी कधीही भेद करीत नसून हे माझे दोन डोळे आहेत. देशा मध्ये महाभारता सारखी स्थिती झाली आहे. या मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी किसन कथोरे जीवाचे रान करतील असे मी जाहीर करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत