BREAKING NEWS
latest

लोकसभा निवडणुका निर्भय तसेच निपक्षपणे होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज - आशुतोष डुंबरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २० मे रोजी २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रकियेचा ५ वा टप्पा पार पडत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयतेने तसेच निपक्षपणे पार पडण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाची पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मतदान शांततेत होण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय पोलीस प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे स्थानिक पोलीस, राज्य राखीव दल तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान शहरात सगळीकडे नाक्या नाक्यावर तैनात करण्यात आले असून कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आल्याचे ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले असून मतदारांनी घराबाहेर पडून लोकशाही करीता चांगले सरकार निवडण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावून येत्या २० मे रोजी आपले बहुमूल्य मत मतपेटीत टाकावे असे आवाहन केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत