BREAKING NEWS
latest

लोकसभा उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना वडार समाजाचा जाहीर पाठिंबा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण जिल्हाच्या वतीने महाराष्ट्राचा कल्याण लोकसभा वडार समाज भव्य मेळावा शुक्रवार १७  तारखेला पूर्वेकडील दत्तनगर येथील लेवा भवन सभागृहात पार पडला. या मेळाव्यात वडार समाजाने महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले, युवा नेता शुभम चौगुले, शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगसेवक रणजीत जोशी, समाजसेवक सुजित नलावडे यांच्यासह मारुती कुशाळकर, लक्ष्मण पेटेकर, प्रभू पवार, लक्ष्मण जडाकर, शहाजी भातकर, लच्छू पवार, महिला आघाडीच्या लक्ष्मी पवार, सुषमा पवार, सुरेखा शिंदे, रेखा पेटेकर, सुवित्रा बमपट्टे, अनिता पवार आदी उपस्थित होते. समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, यांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे त्यामुळे वडार समाजाच्या महाराष्ट्रा प्रदेश संघटना संस्थापक विजय चौगले यांच्या आदेशानुसार आयोजित मेळाव्यात पाठींबा जाहीर केल्याचे सांगण्यात आले. 

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर शहरात वडार समाजाची संख्या जास्त असून संपूर्ण वडार समाज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठशी उभा आहे असेहि युवा नेता शुभम चौगुले यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत