BREAKING NEWS
latest

डोंबिवली एमआयडीसीतील 'अमुदान केमिकल कंपनी'मध्ये भीषण स्फोटात ८ ठार, ६५ जखमी ; अजून मृतांचा आकडा वाढण्याची भीती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२३: डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील 'अमुदान केमिकल कंपनी'मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन आत्तापर्यंत आठ कामगार ठार झालेत. यामध्ये अजून किमान ६५ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम अग्निशामक दलाकडून शर्थीने सुरू आहे.