BREAKING NEWS
latest

देशात सलग तीसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली, दि.०९ : देशात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेत आले आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपसह एनडीएतील घटक पक्षातील नेत्यांनी कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार देशात अस्तित्वात आले आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून, त्यांचे मंत्रिमंडळही निश्चित झाले आहेत. संपूर्ण यादी अशा प्रकारे आहे.

कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन, एस. जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एच. डी. कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतनराम मांझी, राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह, सर्वानंद सोनोवाल, विरेंद्र कुमार, केजराप्पू रायमोहन नायडू, प्रल्हाद जोशी, ज्युएलो राम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरण रिजूजू, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सी. आर. पाटील. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार राव इंद्रजित सिंह, डॉ. जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी. राज्यमंत्री जितीन प्रसाद, श्रीपाद नाईक, पकंज चौधरी, श्रीकृष्ण पाल, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमण्णा, चंद्रशेखर प्रेमासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बीएल वर्मा, शांतनू ठाकूर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय टम्टा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय शेठ, रवनीत सिंग बिट्टू, दुर्गादास ऊईके, रक्षा खडसे, सुखांता मजुमदार, सावित्री ठाकूर, तोखन साहू, राज भूषण चौधरी, भूपती राजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन बामनिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरिअन आणि पवित्र मार्गरिटा यांचा समावेश आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत