कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आज पाणी पुरवठा विभागामार्फत कल्याण पश्चिम येथील 'दुर्गाडी किल्ला ते रेतीबंदर ते पत्रीपुल' दरम्यानच्या ११०० मी.मी. व १४०० मी.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील तबेले धारकांनी घेतलेल्या अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली. १,१.५ व २ इंची व्यासाच्या एकुण ४८ अनधिकृत नळजोडण्या पोलीस बंदोबस्तात खंडीत करण्यात आल्या. शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा) अशोक घोडे व शैलेश मळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण व डोंबिवली विभागातील उप अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांनी सदर कारवाई यशश्विरित्या पार पाडली.
ही कारवाई केल्याने कल्याण पूर्व विभागाच्या पाणी पुरवठयात वाढ होणार आहे. तसेच सदर अनधिकृत नळजोडण्या पुन्हा होवू नयेत याबाबत महानगरपालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा