उंबार्ली दि. २८ जून : कल्याण-तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने आणि उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली असून या मेट्रोसाठी सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे. ही बांधकामे हटविण्याची नोटिस या पूर्वीच तहसील कार्यालकाडून संबंधितांना देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने सन २०२२ कालावधीत दिला आहे. कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी जागेचे सर्वेक्षण नंतर करा पहिल्यांदा माेबदला द्या अशी भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेत जागेच्या सर्वेक्षणास विरोध केला आहे डोंबिवली सोनार पाडा उंबरली रोड येथील माणगाव परिसरात घडला. दरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार व पाेलिस बंदाेबस्तात सर्वेक्षणाच्या कामास प्रारंभ केला.
कल्याण ग्रामीण क्षेत्रात कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामाला लवकरच सुरुवात होणार अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. याच कल्याण तळोजाच्या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा ही मेट्रो रेल्वेच्या कामाकरीता राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. त्याठिकाणी जागा सर्वेक्षणाकरीता एमएमआरडीएचे सर्व्हेअर गेले असता शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. पण सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. याविषयी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना एक लेखी निवेदन दिले आहे.
सोनारपाडा, उंबार्ली, माणगाव परिसरात जागा राज्य सरकारने महसूल खात्यामार्फत कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाकरीता वर्ग केली आहे. प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेली जागा ही गायरान आहे. या गायरान जागेवर अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आहेत. ही बांधकामे हटविण्याची नोटीस या पूर्वीच तहसील कार्यालकाडून देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने २०२२ साली दिले आहेत.
या ठिकाणी शेतकरी दशरथ म्हात्रे यांनी सांगितले की, आमची शेतजमीन वडिलोपार्जित आहे. ही जागा प्रकल्पांच्या बाधित गायरान जमीनीच्या मध्ये आहे. त्याठिकाणी एमएमारडीएकडून जबरदस्तीने सर्वेक्षण केले जात आहे. आमच्या शेतजागेचा मोबदला आजच्या बाजारभावाने आम्हाला द्यावा. मगच सर्वेक्षणाचे काम करावे. या बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी देखील या सर्वेक्षणास विरोध केला आहे. या ठिकाणी असलेल्या पाच बेकायदा बांधकामांच्या विरोधात निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सह्याचे एक निवेदन यावेळी तहसीलदारांना दिले. शेतकऱ्यांनी सर्वेक्षणाला विरोध केला असला तरी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा