BREAKING NEWS
latest

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आता निम लष्करी दलाकडे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली, दि. १२ : सलग तिसर्‍यांदा देशाची सत्ता हाती आल्यावर मोदी सरकारने आता महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या सुरक्षारचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशा व्यक्तींची सुरक्षा आता एनएसजी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस यांच्याकडून काढून निमलष्करी दलाकडे सोपविली जाणार आहे.

देशातील विविध राजकीय पक्षांचे नेते, माजी मंत्री, सेवानिवृत्त नोकरशहा आणि इतर काही अतिमहत्वाच्या व्यक्तीना एनएसजी आणि आयटीबीपीची सुरक्षा दिली जाते. नऊ झेड-प्लस वर्गवारीतील ही सुरक्षा व्यवस्था असते. ही सुरक्षा व्यवस्था आता निमलष्करी दलाकडे सोपविली जाणार आहे.

दरम्यान, सध्या नऊ झेड-प्लस वर्गवारीची सुरक्षा असणाऱ्यांमध्ये योगी आदित्यनाथ, मायावती, राजनाथसिंह, लालकृष्ण अडवाणी, रमण सिंह आणि काही भाजपाचे नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांना एनएसजी सुरक्षा कवच आहे. तर फारूक अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, चंद्राबाबू नायडू यांना एनएसजी आणि मुरली मनोहर जोशी, ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि इतरांना आयटीबीपी सुरक्षा कवच आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत