उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी सुरु असणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारचे बेकायदेशिर बांधकामावर कारवाई करणेसाठी मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. उल्हासनगर यांनी मा. प्रशासक तथा आयुक्त यांना लेखी पत्रान्वये कळविले होते. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात खाली नमुद केलेल्या ऑर्केस्ट्रा बारच्या बेकायदेशिर बांधकामावर दिनांक २६/६/२०२४ रोजी सहायक आयुक्त, प्रभाग समिती व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करुन बारमधील बेकायदेशिर बांधकाम निष्कासीत केलेले आहे.
१) एप्पल बार, श्रीराम चौक्, उल्हासनगर-४,
२) एंजल बार, श्रीराम चौक, उल्हासनगर-४
तर शहरातील इतर बारमालकांना देखिल नोटीस बजावण्यात आलेली आहे. सदर बारच्या मालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरु असून पडताळणीअंती जे बार बेकायदेशिर आढळून येतील त्यांचेविरुध्द् निष्कासनाची कारवाई करणेसाठी मा. प्रशासक तथा आयुक्त अझीझ शेख यांनी सर्व सहायक आयुक्त यांना आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व सहायक आयुक्तांमार्फत कारवाई सुरु करण्यात आलेली आहे अशी माहिती उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा