BREAKING NEWS
latest

'जन गण मन' इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर मध्ये 'जे एम एफ' ऑल इंडिया शिष्यवृत्ती' चा निकाल जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०१: नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकाससाठी कार्यरत असलेली 'जे एम एफ' शिक्षण संस्था गेली तीन वर्षापासून "जे एम एफ शिष्यवृत्ती" ही शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी प्रदान करत आहेत. केवळ डोंबिवली येथीलच विद्यार्थी नाही तर संपूर्ण भारतातून विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षी शिष्यवृत्ती साठी एक परीक्षा घेण्यात येते व त्या निकालातून उत्कृष्ठ पाहिले तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 'जे एम एफ शिष्यवृत्ती' देण्यात येते.

'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पदक देऊन शिष्यवृत्ती योजना आखली. मुंबई बरोबरच नागपूर जिल्ह्यातील दावसा ह्या गावी देखील 'जन गण मन कॉन्व्हेन्ट स्कूल' मध्ये देखील हजारो विद्यार्थी ह्या शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा साठी बसले होते. त्याच बरोबर ऑनलाईन पद्धतीने देखील बऱ्याच विद्यार्थ्यानी परीक्षा दिल्या.
कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, त्याच बरोबर प्राचार्य आमोद वैद्य, प्राचार्या श्यामला राव, उपप्राचार्या तेजावती कोटीयन, ज्योती व्यंकटरामन, समन्वयक ममता राय यांनी सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रथम आलेल्या रोमी शो (इयत्ता तिसरी) या विद्यार्थिनीला  रोख रक्कम , सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले तर अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवलेल्या समायरा दिवे (इयत्ता तिसरी) व निकुंज लांजेकर (इयत्ता दुसरी) च्या विद्यार्थ्यांना रौप्य आणि ब्राँझ पदक, रोख रक्कम, आणि प्रशस्तीपत्रक देऊन अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि खजिनदार जान्हवी कोल्हे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आयपीएस, आयएएस अधिकारी व्हावे अशी इच्छा प्रकट करून तुम्ही सामान्य ज्ञान बरोबरच इतर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करून त्या परीक्षा द्या, आजच्या काळात जागतिक चालू घडामोडींची माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही कायमच सतर्क आणि सलग्न राहून घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेत रहा असे सांगितले. ज्यावेळी आपण मैदानात फुटबॉल स्पर्धा खेळायला जातो त्यावेळी तो बॉल टाकण्यासाठी जाळीच नसेल तर त्या स्पर्धेला अर्थ नाही, याचा अर्थ असा की तुम्ही तो गोल साध्य करण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून तुमचे लक्ष्य साधा, असा उपयुक्त सल्ला सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. सर्वांचे अभिनंदन करून ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यांनी नाराज न होता पुन्हा पुढच्या वर्षी  नव्याने प्रयत्न करा असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून त्यांना प्रोत्साहन दिले. 'जे एम एफ शिष्यवृत्ती' स्पर्धा परीक्षेची जबाबदारी संपूर्णतः वंदे मातरम् पदवी महाविद्यालय च्या प्राध्यापिका शर्वरी मॅडम यांनी सांभाळली होती. 'जन गण मन' शाळेच्या उप प्राचार्या ज्योती व्यंकटरामन यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नावाची घोषणा केली तर कार्यक्रमाच्या  शेवटी संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत