BREAKING NEWS
latest

'आर्ट ऑफ लिव्हींग' संस्थेच्या करीअर मार्गदर्शन प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण दि. २८: 'आर्ट ऑफ लिव्हींग' संस्थेच्या प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणाचा आयुष्यातील चांगले निर्णय घेण्यास उपयोग होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज झालेल्या करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमात केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजिलेल्या "करिअर मार्गदर्शन" या कार्यक्रमात बोलताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.
शाळेत मुले शिकतात व महाविद्यालय विद्यार्थ्यांना घडविते त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील करिअर प्रोफेशन निवडताना काळजीपूर्वक निवडावे अशाही उपयुक्त सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिल्या. आपले कौशल्य व ज्ञान अद्यावत केले तर यशप्राप्ती फार दूर नाही. यशस्वी करिअरसाठी प्रथम स्वप्न बघायला शिकावे, सवयी चांगल्या असतील तर यश लवकर मिळेल, आपले पॅशन ओळखायला शिका आणि योग्य करिअर निवडा,‍ करिअरसाठी विचारपूर्वक आखणी करुन आपले उद्दीष्ट्ये निश्चित करा, असे आपल्या ओघवत्या भाषा शैलीत विविध उदाहरणांच्या आणि सादरीकरणांच्या माध्यमातून सांगत 'आर्ट ऑफ लिव्हींग' या संस्थेचे प्रशिक्षक नील पांडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.
आर्ट ऑफ लिव्हींगच्या प्रशिक्षक कृतीका यांनी देखील उद्भोदक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महापालिकेचे अतिरिक्त-२ धैर्यशील जाधव यांनी नेहमीच्याच खुमासदार पध्दतीने केले. सदर कार्यक्रमास १०वी व १२वी च्या विद्यार्थी वर्गाने प्रचंड संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या सुंदर अशा कार्यक्रमाची सांगता महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी घेतलेल्या ऊॅंकार,भस्रिका प्राणायाम, आणि ध्यानाने करण्यात आली. शिक्षणाधिकारी  विजय सरकटे यांनी सर्वांचे आभार मानले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत