डोंबिवली : मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रीजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला सौ. श्वेता नितीन नरवडे (वय: २६ वर्षे) या दिनांक ०६/०९/२०२४ रोजी रात्री आठ वाजता अनंतम रीजन्सी ते डोंबिवली स्टेशन असा रिक्षाचा प्रवास करीत असताना रिक्षात ठेवलेली पर्स नकळत पाठीमागे विसरून गेल्या. सदर पर्समध्ये एकुण ४ तोळे सोन्याचे दागीने होते त्यात एक दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅम दोन लहान मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी, ९ ग्रॅम चांदीचे मनगट्या, गळ्यातील लहान सोन्याचे एक पान व रोख रक्कम असा ऐवज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दागिने असलेली पर्स रिक्षात विसरली असल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच मानपाडा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली.
मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे ) राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संपत पडोळ यांनी लागलीच एक टीम तयार केली. पोलीस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड यांना सदर ठिकाणी ताबडतोब रवाना करून त्यांनी तांत्रिक पद्धतीने बावीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून रिक्षाचा तीन तासात शोध घेऊन त्यांची हरवलेली पर्स परत आणून त्या महिलेला दिली. महिलेने त्यांचे आभार मानत मानपाडा पोलीसांच्या उत्तम कामगिरी मुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा