BREAKING NEWS
latest

आषाढी वारी दरम्यान पांडुरंगाच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाखांचं दान जमा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्ताने राज्यातून आणि परराज्यांतून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमा झाले होते. हरीनामाच्या जयघोषात दंग झालेले हे वारकरी विठूरायाला आपापल्या परिस्थितीनुरुप काही ना काही पैसे, द्रव्य अर्पण करत असतात. यानिमित्ताने विठ्ठलाच्या दानपेटीत दरवर्षीच कोट्यवधी रुपयांचे दान जमा होते. याची मोजदाज करण्यासाठी मंदीर समितीच्या कर्मचाऱ्यांना कित्येक तास लागतात. यावर्षी पंढरपूरच्या दानपेटीत तब्बल ८ कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. देणगी पावत्यांच्या स्वरुपात जवळपास ३ कोटी ८२ लाख रुपये दान करण्यात आले आहे. इतर योजनांमधूनही दान आलं आहे. तर आषाढी वारीच्या काळात तब्बल १० लाख ८८ हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. मंदिर समितीकडून याबाबत नुकतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ कोटीचं वाढीव दान आहे. यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर तब्बल ७७ लाख रुपये दान करण्यात आलं आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून ९८ लाखाचं दान आलं आहे. सोनं आणि चांदी यांचे दान जवळपास २ कोटी ५० लाखांच्या घरात आहे.

दरम्यान आषाढी वारीच्या काळात रात्रंदिवस भक्तांना दर्शन देणाऱ्या विठुरायाचा क्षीण घालवण्यासाठी आज प्रक्षाळ पूजा संपन्न झाली. या प्रक्षाळ पूजेनिमित्त देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. संपूर्ण मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आले होते.

आषाढी यात्रे दरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास २० दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो. ज्यामुळे देव झोपत नाही, अशी भावना आहे. यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी याचसाठी दर्शन थोड्या वेळेसाठी बंद असते. या २० दिवसात देव झोपत नसल्याने मंदिरही २४ तास उघडे असते. काल रात्री मंदिर समितीच्या वतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोळून मालिश करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यावर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर विठुरायाला रुद्राभिषेक करण्यात आला.

'नासा' अंतराळात प्रक्षेपित करणार कृत्रिम तारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यूयॉर्क : जगभरातील देशांनी आणि अवकाश संशोधन संस्थांनी आजवर अवकाशात अनेक कृत्रिम उपग्रह सोडले आहेत. मात्र अद्याप कोणीही अंतराळात कृत्रिम तारा प्रक्षेपित केला नव्हता. हे आव्हान आता 'नासा' अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था पेलणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. नासाने या मोहिमेला 'लँडोल्ट मिशन' असे नाव दिले आहे.

या मोहिमेला खगोलशास्त्रज्ञ अर्लो लँडोल्ट यांचे नाव देण्यात आले आहे आणि ते २०२९ मध्ये प्रक्षेपित केले जाणार आहे. ‘नासा‘ चा हा कृत्रिम तारा अमेरिकेच्या अवकाशात पृथ्वीपासून ३५,७८५ किलोमीटर अंतरावरच्या कक्षेत स्थापित केला जाणार आहे. फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्राचे सहायक प्राध्यापक जेमी टेयर यांच्या मते, इतर ताऱ्यांभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहांवर महासागर अस्तित्वात आहेत की नाही आणि अशा ग्रहांवर जीवनाची उत्पत्ती होऊ शकते का, याचा या मोहिमेद्वारे शोध घेतला जाईल. या मोहिमेमुळे ताऱ्यांच्या सभोवतालची अशी ठिकाणे शोधता येतील, जिथे जीवसृष्टी असण्याची किंवा उगम होण्याची शक्यता आहे.याशिवाय हे मिशन 'एलियन्स'च्या अस्तित्वासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणार मोफत एलपीजी गॅस सिलेंडर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. राज्यातील लाडक्या बहि‍णींना आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे महिन्याला १५०० रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याचा फायदा राज्यातील ५६ लाख हून अधिक कुटुंबाना होणार आहे. अल्प उत्पन्नगट आणि अत्यल्प उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे. तीन सिलिंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलिंडरमागे ३०० रुपये अनुदान देते. एका गॅस सिलिंडरची सरासरी किंमत ८३० रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर ५३० रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही.

पैसे कसे मिळणार ?

गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल, असा अंदाज आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

'जे एम एफ' शाळेमधील बाल गोपालांनी येथेच्छ लुटला पावसाळी सहलीचा आनंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : "नेहेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक सृष्टीचे जाण बाळा", पाऊस हा सर्वांचाच आवडता ऋतू, तर पावसाच्या सरी मध्ये भिजणे म्हणजे विलक्षण आनंद. दरवर्षीच हा आनंद लुटण्यासाठी जन गण मन' इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर चे विद्यार्थी सज्ज असतात. पावसात गेलास तर सर्दी खोकला होईल, अशी सक्त ताकीद देणारे पालकांचे पाल्य सदा नाराजच असतात. परंतु 'जे एम एफ' शाळेमध्ये पावसातून चालत जाण्याचा आणि भिजण्याचा आनंद म्हणजेच एक दिवसीय पावसाळी सहल. ह्या पावसाळ्या सहलीचे आयोजन 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक डॉ.राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ.प्रेरणा कोल्हे यांनी प्रत्येक पावसाळी ऋतू मधे केले आहे, म्हणजेच 'रेन वॉक्'.
दिनांक १९ व २० जुलै रोजी डोंबिवली पश्चिम येथे नवीन झालेल्या माणकोली पुलावर  व  खाडी परिसर येथे इयत्ता शिशु विहार ते चौथीच्या मुलांना घेऊन जाण्यात आले. पावसात चालत चालत भिजायला मिळणार ह्या कल्पनेनेच मुले आनंदाने भारावून गेली. इतर वेळेला आपली मुले भिजतील ह्या काळजीने मुलांना पावसात न जाऊ देणारे पालक देखील मुलांना पाठवण्यात आनंद घेऊ लागले व मुलांना रेनकोट, छत्री देऊन त्यांचे बालपण पाहू लागले. सर्व शिक्षकांनी देखील काळजीपूर्वक मुलांना रेनकोट घालून, शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे करून बसमधे बसवले. त्यावेळी मुलांचा आणि पालकांचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. 
संस्थेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सदिच्छा देत, सर्व मुले वेगवेगळ्या रंगाचे रेनकोट घातल्यामुळे जणू काही 'जे एम एफ' शाळेमध्ये रंगबिरंगी फुलपाखरेचं अवतरली आहेत असे उद्गार काढून, तुमच्या आनंदामुळे आमचेही मन प्रफुल्लित झाले आहे व पावसाचा  मनसोक्त आनंद लुटा असे सांगून मुलांचा आनंद द्विगुणित केला. "गणपती बाप्पा मोरया" चा जयघोष करत बस सुटली आणि मुलांच्या आनंदाचा जल्लोष सुरू झाला. प्रत्येकाच्या मनात, गप्पात एकच आनंद तो म्हणजे पावसात 'रेन वॉक्' करत चालत भिजणे. पावसाची गाणी, नाच करत बसमधून निघालेली स्वारी रेल्वे क्रॉसिंग जवळ येऊन थांबली आणि लांबलचक आगगाडी बघताच पुन्हा मुलांचा जल्लोष सुरू झाला. आगगाडी गेल्यावर थोडे पुढे जाताच माणकोली पुल सुरू झाला, पुलावरून दोन्ही बाजूला दिसणारी खाडी बघुन मुलांचा हर्ष गगनात मावेनासा झाला. अखेरीस बस मधून खाली उतरून पावसाची मजा घेत सर्व बालगोपाल एकमेकांचा हात धरून चालू लागले. रिमझिम पाऊस, मंद वारा, चिमुकल्या डोळ्यात समावणारी पुलाखालील अथांग खाडी. काही मुलांनी हातात घेतलेली छत्री वाऱ्याने हवेत सरकली जायची त्यावेळी पावसाचे पाणी अंगावर पडताना मुलांचा निखळ हासरा दिसणारा चेहरा. अहाहा काय वर्णावे ! ते दृश्य पाहून मन झाले तृप्त. सर्वच मुले आनंदाने नाचू गाऊ लागली. खाडी परिसरात गोल रिंगण करून शिक्षकांनी मुलांसीबत खेळ खेळले. उड्या मारणे, पावसात पाण्यात खाली बसून एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, कागदी नाव करून पाण्यात सोडणे, पावसाच्या सरी हातात घेणे, आकाशाकडे बघत ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा.. असे मोठ्याने म्हणत जणू काही पाऊस हा आपल्या गाण्यामुळेच आला आहे असा खरेपणा वाटणे म्हणजेच खरे बालपण. हा बाल आनंद सर्वांनी लुटला. सर्व वर्ग शिक्षिक, कलात्मक शिक्षकांनी मुलांचे फोटो, व्हिडीओ काढून पावसाळी सहलीचा आनंद येथेच्छ लुटला.

भारताचे 'मिसाईल मॅन' माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम यांना भावपूर्ण आदरांजली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून आदराने संभोधले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम हे २७ जुलै २०१५ रोजी आजच्या दिनी आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. राष्ट्रपती भवनात एक सूटकेस घेऊन आलेल्या आणि राष्ट्रपती भवन सोडताना तिच सूटकेस घेऊन थेट आपल्या गावी गेलेल्या या 'अग्निपंखा'वर जगभरातून भावपूर्ण श्रद्धांजलींचा वर्षाव झाला. त्यात एक थेंब गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचाही होता. दिवंगत 'भारतरत्न'ला श्रद्धांजली व्यक्त करताना लतादिदी म्हणाल्या,"दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या कविता माझ्या व्यस्ततेमुळे मी गाऊ शकले नाही याची कायम मला सल राहील".

लतादिदी, आपली व्यस्तता आम्ही समजू शकतो. पण विज्ञानाचे पंख पांघरून अवकाशात आकाश भराऱ्या घेणाऱ्या कलाम साहब यांना भारतवर्ष अंतराळगीत म्हणून गात राहील. साधं राहणीमान आणि उच्चं विचाराचे ते आदर्श उदाहरण होते. भारताच्या या महान व्यक्तिमत्वाला जाहीर सलाम वं मानाचा मुजरा. बारशाचं तेरशाला अन् तेरशाचं बारशाला बोलायचं नसतं. पण जाता जाता मोह आवरत नाही एक आठवण शेअर करण्याची.. कलाम साहेबांच्या औदार्याची ! 

१७ जुलै १९८० ला सायंकाळी कलाम साहेब आणि तत्कालीन संरक्षणमंत्री समुद्राच्या बिचवर फिरत होते. सॅटेलाईट लाँचिंगची सर्वांच्याच मनात अस्वस्थता होती. कुणीच काही बोलत नव्हतं. अखेर संरक्षण मंत्र्यांनी कोंडी फोडली. ते म्हणाले, कलामजी, बोलिए.. कल जश्न कैसा मनाने का है.. ?
त्यावर कलाम साहेब म्हणाले "अपने सेंटर में १ लाख पौधे लगाकर" !

भारताची अंतराळातील जगाला ओळख करून देणारे असे स्वयंप्रकाशित, स्वयंसिद्ध, आत्मनिर्भर  'अग्निपंख' पुन्हा पुन्हा पृथ्वीतलावर जन्माला येत नसतात. संपूर्ण भारताच्या वतीने 'मिसाईल मॅन' यांना विनम्र अभिवादन आणि आदरांजली !!

जय विज्ञान !
जय संविधान !!
जय भारत !!!

1971 से चल रहे गैरेज को किया गया अनाधिकृत घोषित! नगर पालिका पर सवालिया निशान?

कांदिवली पश्चिम एस.वी. रोड पर स्थित 1971 से लगातार चल रहे एक गैरेज़ पर नगर पालिका के आर. साउथ डिवीजन ने कार्रवाई की है और इस गैरेज को अनाधिकृत घोषित कर दिया है। इस गैराज के मालिक का नाम रंजीत मापरा है और "1971 से नगर निगम को नियमित टैक्स का भुगतान करने के बावजूद मेरे साथ ऐसा क्यों हुआ?" ऐसे मापरा ने नगर पालिका से सवाल किया है। इस गैराज के डिज़ाइन को नगर पालिका के आर.दक्षिण प्रभाग द्वारा अनुमोदित किया गया था। इसके साथ ही मापरा ने आरोप लगाया है कि आर. साउथ विभाग द्वारा भ्रष्टाचार किया गया है, क्योंकि सोसायटी को नियमित रूपसे मेंटेनेंस के साथ-साथ नियमित बिजली बिलों का भुगतान करने के बावजूद ये कार्रवाई की गई है।


इस बीच स्थानीय लोगों का कहना है कि नगर पालिका ने सोसायटी की योजना को देखे बगैर यह कार्रवाई की है। कुल मिलाकर मापरा के पास मौजूद दस्तावेजों को देखें तो बृहन्मुंबई नगर निगम के आर. साउथ डिविजन पर सवालिया निशान लग रहा है।

बीजेपी विधायक योगेश सागर ने कहा, ''यह गैराज पूरी तरह से अनधिकृत है, उनके पास कोई आधिकारिक सबूत नहीं है.''

योगेश सागर के बयान पर सवाल यह उठ रहे है की अगर यह गैरेज अनधिकृत है तो जब इसकी स्थापना की गई थी तब इसे क्यों अनुमति दी गई थी ? क्यों टैक्स लिया जा रहा था ? इस तरहके कई सवाल फ़िलहाल इस घटना को देखते हुए सामने आ रहे है। 


रिदम डान्स अकॅडमी मध्ये कलियुगात ही श्रावण बाळाचे धडे!


आजच्या मोबाईल च्या युगात कुठेतरी आपला संस्कृतीचा विसर पडत चाला आहे हे लक्षात घेऊन आजच्या पिढी ला गुरुपौर्णिमा चे महत्त्व पटवून देऊन दि रिदम डान्स अकॅडमी च्या सर्व ब्रांच मध्ये गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साप्ताहिक साजरा केला यात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगांव, शिवटेकडी आणि चार्निरोड ब्रांच मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी गुरूंचे महत्त्व तसेच, आपले सर्वात पाहिले गुरू हे आपले पालक असतात आणि आपल्या आयुष्यात पालकाचे महत्त्व आणि आपल्यासाठी त्यांचे केले जाणारे श्रम याचे महत्त्व सांगण्यात आले आणि विद्यार्थायांनी आपल्या पालकांचे पाया पडून औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन ही गुरुपौर्णिमा दि रिदम डान्स अकॅडमी च्या सगळ्या ब्रांच मध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी रिदम डान्स अकॅडमीचे संस्थापक रहीम तंबोळी, सहायक -सोनाली नारकर, लेखा शिरोडकर , तन्वी शिद्रुक यांच्या संकल्पनेतून उपक्रम पार पडला.
बुधवार ते रविवार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये 120 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग घेतला होता.
अशी बातमी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांच्या संकल्पनेतून उपक्रम पार पडला अशी माहिती यांनी दिली.