डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली सार्वत्रिक निवडणूक डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २५ (अ) मधून सौ. मनीषा शैलेश धात्रक २५ (ब) मधून पूजा शैलेश धात्रक व २५ (क) मधून शैलेश रमेशचंद्र धात्रक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुरस्कृत उमेदवार असून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते मतदान मागत असून मतदारांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. ठिकठिकाणी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन ते संवाद साधत आहेत. त्यामुळे विकास कामांच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे मनीषा शैलेश धात्रक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे.
शैलेश रमेशचंद्र धात्रक व मनीषा धात्रक हे कुटुंब गेली अनेक वर्ष या प्रभागाचे यशस्वी नेतृत्व करीत आहेत. प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून देणे, गटारे, नाले सफाई, मुबलक पिण्याचे पाणी या सुविधा नागरिकांना नियमित दिल्या आहेत तसेच इतर सामाजिक कामे देखील केलेली आहेत व विकासकामांची गंगा प्रभागात वाहत आहे. मनीषा शैलेश धात्रक यांनी सांगितले की प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गेले अनेक वर्षे लोकोपयोगी कामे केलेली आहेत त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.